बहुजननामा ऑनलाइन टीम : चोरीच्या सर्व अनोख्या घटना तुम्ही ऐकल्या असतीलच आणि आता एक वेगळीच घटना घडली आहे. व्हेनेझुएलामधील शॉपिंग मॉलमधील एका महिलेने चक्क जीन्स चोरी करण्यासाठी स्वतः एका जीन्सवर ९ जीन्स परिधान केल्या होत्या. तिचा व्हिडिओ आणि फोटो पाहून तुम्हाला देखील आश्रर्य वाटेल. त्या महिलेने ९ जीन्स कशा घातल्या, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मात्र, हे खरे आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…..
तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती मुलगी स्पष्टपणे ९ जीन्स घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ वॉशरूममधला दिसत आहे. त्या महिलेचा ९ डेनिम जीन्स परिधान करतानाचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती मुलगी जीन्स काढण्याच्या दरम्यान काउंटिंग करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनूसार महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. ही घटना कोणत्या मॉलमध्ये घडली हे देखील माहिती नाही.
या व्हिडिओला फेसबुकवर साडेचार लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर सर्वांनी मजेदार कमेंट देखील केले आहेत. काही युजर्सला आश्चर्य वाटले की मुलीने एकत्र 9 जीन्स कसे परिधान केले आहे. असे बरेच व्हिडिओ यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ऑगस्टमध्ये एका दुकानातून तीन महिलांचा चोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यापैकी एका महिलेने घाईघाईने आपल्या मुलाला दुकानात सोडले होते.
Visit : bahujannama.com