बहुजननामा ऑनलाइन टीम – पूर्व युरोपातील मॉल्डोवा देशातील 21 वर्षीय इन्स्टाग्राम मॉडेलने आपल्या जन्मदात्या आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना(Instagram model) समोर आली आहे. एना लेकोविच (वय – 21) असे या मॉडेलचे नाव असून तिने स्वत:ची आई प्रास्कोव्या लेकोविच (वय – 40) हिचा किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या चाकूने सपासप वार करुन खून केला. एवढेच नाही तर तिने आईचं हृदय आणि अन्य अवयव शरिरापासून वेगळे केले. या प्रकरणात मॉडेल एनाला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, अद्याप एनावर कोणत्याही आरोपाची पुष्टी झाली नसून पोलीस करत आहेत. आईच्या खूनाच्या गुन्ह्यात ती संशयित असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. एका रिपोर्टनुसार एनाने किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या चाकूने पहिल्यांदा स्वत:च्या आईवर वार केले त्यानंतर तिचं हृदय आणि अन्य अवयव कापून शरीरापासून वेगळे केले. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला.
एना ही वैद्यकीय शिक्षण घेणारी तरुणी असून इन्स्टाग्रमवर ती प्रसिद्ध आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 16 हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. ऐना नेहमी तिचे हॉट आणि सुंदर फोटो इस्टावर शेअर करत असते. तिच्या पोस्टला हजारो लाईक्स मिळतात. तर एनाची आई प्रास्कोव्या लेकोविच या जर्मनीत नोकरी करत होत्या. एका रिपोर्टनुसार, एनाच्या आईला संशय आला होता की, आपली मुलगी ड्रग्सच्या आहारी गेली आहे. त्यामुळे तिच्या उपचारासाठी ती आली होती. हेच खूनाचे मुख्य कारण असल्याची चर्चा आहे.
या घटनेबाबत एनाच्या काकांनी सांगितले की, प्रास्कोव्या ऐनावर खूप प्रेम करत होती. ती जास्तीचा वेळ तिच्यासोबत घालवण्याचा प्रयत्न करत होती. पोलिसांनी अवघ्या दोन तासात एनाला मुख्य संशयित म्हणून अटक केली. मी याबाबत कल्पनाही करु शकत नाही, की एनाने तिच्या आईचा खून केला असेल. याच दरम्यान एनाला पोलिसांनी न्यायालयात हजर करण्यासाठी पोहचल्याचा एका व्हिडीओ समोर आला. त्यामध्ये पत्रकारांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर एनानं हसत हसत गुडबाय म्हणून उत्तर दिलं.