बहुजननामा ऑनलाइन टीम – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) एका अधिकाऱ्याला एकटे पाहून पाठिमागून आलेल्या लुटारुने त्यांचा गळा दाबला. त्यावेळी तो अधिकारी बेशुद्ध होऊन खाली पडल्याने त्याचा मोबाईल हिसकावून (robbers snatched the mobile )घेऊन तेथून आरोपी पसार झाला. हि घटना बीकेसी येथे घडली आहे.आरबीआयचा अधिकारी जेवण झाल्यानंतर रात्री बाहेर फिरण्यासाठी आला होता. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, बीकेसी येथील आरबीआयच्या ऑफिसर्स क्वाँँटर्समध्ये तक्रारदार राहण्यास आहेत. रविवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यान फिरत असताना, अचानक पाठिमागून आलेल्या लुटारुने त्यांच्या गळ्याला दाबले.आणि तो बेशुद्ध होवून खाली कोसळताच त्यांच्याकडील २२ हजार किंमतीचा मोबाईल घेऊन त्याने तेथून पळ काढला. अधिकारी शुद्धीवर आल्यानंतर तो घरी गेला. घड़लेला प्रकार सांगताच कुटुंबियांनाही धक्का बसला.
अखेर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी पहाटेच्या सुमारास बीकेसी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांकड़े विचारणा केली असता त्यांच्याकड़ून माहिती देण्यात आली नाही. परिसरातील सीसीटिव्हीच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. काही संशयितांकड़े चौकशीही सुरु करण्यात येत आहे. तसेच मोबाईल लोकेशन नुसार पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. .