निमगाव/ उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – लग्नानंतर हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहित महिलेला अॅसिड पाजल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील नीमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या तक्रारीवरुन पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाले आहेत. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, तिच्या सासरच्यांनी तिला हुंड्याच्या मागणीवरुन जबरदस्तीने अॅसिड पिण्यास भाग पडले. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक आहे.
पीडितेचा भाऊ नितेश मिश्रा याने सांगितले की, बहिणीला तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी जबरदस्तीने अॅसिड पाजले नाही तर तिला जाळले. त्यामुळे पीडितेचा खालचा भाग जळालेला आहे. गंभीररीत्या जळालेल्या बहिणीला जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी उलटी करायला सांगितली, तेव्हा अॅसिडमुळे जळाल्याने मासाचे तुकडे बाहेर पडले. पोलिसांनी नितेश मिश्राचा जबाब मंगळवारी घेतला आहे. त्याने जबाबात सांगितले की, त्याच्या बहिणीला मारुन नवरा दुसरा लग्न करणार होता. असा त्याचा कट आहे. बहिणीला दोन वर्षाची मुलगी आहे, तीने तिला आपल्या बरोबर आणले आहे.