Pune Crime | धक्कादायक! भररस्त्यात पत्नीचा गळा दाबून रस्त्यावर आपटले, पुण्यातील घटना
पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | घरगुती भांडणातून पतीने पत्नीचा भररस्त्यात गळा दाबून रस्त्यावर आपटल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. ही घटना पुण्यातील (Pune Crime) निगडी पोलीस ठाण्याच्या (Nigdi Police Station) हद्दीत घडली असून हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थी करुन दोघांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पत्नीने पती विरोधात तक्रार करण्यास नकार दिल्याने त्यांचे समुपदेशन (Counseling) करुन सोडून दिले.
सीसीटीव्हीमध्ये महिला पायी रस्त्याने चालताना दिसत आहे. तर पती त्याच्या लाल रंगाच्या स्कुटीसोबत पुढे येऊन थांबलेला दिसत आहे. आपल्या पत्नीला मागून येताना गाडीवरुन उतरुन तिच्या मागे पळू लागतो. यावेळी तो पत्नीचा गळा दाबतो (Wife Strangled) आणि तिला जोरदार खाली आपटतो. यावेळी तो पत्नीला रस्त्यावर लोळवतो. महत्त्वाचे म्हणजे ज्याठिकाणी हा प्रकार घडला आहे तो रस्ता वर्दळीचा असल्याचे दिसत आहे. रस्त्याने गाड्यांची ये-जा सुरु आहे. भरदिवसा हा प्रकार घडला आहे. (Pune Crime).
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पती आणि पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण होत असते. याच भांडणातून अनेकजण टोकाचं पाऊल उचलतात. तर काहीजण विभक्त होण्याचा निर्णय घेतात. पती-पत्नीच्या भांडणात पत्नीच्या घरच्यांचा हस्तक्षेप होत असल्याने विभक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. काहीवेळेला मारहाण, आत्महत्या (Suicide) असे अनेक प्रकार होत असल्याचे पहायला मिळत आहे.
Web Title : Pune Crime |Shocking , pimpri chinchwad his wife was strangled and hit road.
Comments are closed.