बहुजननामा ऑनलाइन – पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मौजे रीसे या गावातील एका व्यक्तीने आपल्या भावजईचा खून केल्याची घटना घडली आहे . या बाबतची तक्रार खून झालेल्या महिलेच्या मुलीने जेजुरी पोलीस स्टेशनला दिली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की , रीसे येथील मुबारक कादर सय्यद हा त्याची भावजई शाबीरा जैनुद्दीन सय्यद ( वय ४५ ) हिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत होता . परंतु ती त्यास तयार होत नसल्याने काल दिनांक २१ / ९ / २०२० रोजी रात्रीचे जेवण झाल्यानंतर शाबीरा खरकटी भांडी घासत असताना मुबारक कादर सय्यद याने घराची बाहेरची कडी लावून शाबीराकडे गेला . त्यावेळी घरातून शाबिराची मुलगी हसीना व घरातील लोकांनी मुबारकला तू काय करत आहेस? दरवाजा उघड म्हणून समजावले परंतु त्याने दरवाजा उघडला नाही . शाबीराकडे शरीर सुखाची मागणी केली . त्यास तिने नकार दिल्याने मुबारक कादर सय्यद याने चिढून हातातील सुरीने शबीराच्या छातीवर , डाव्या हाताच्या मनगटावर , डाव्या पायाच्या मांडीवर , डाव्या पायाच्या घोट्यावर वार करुन तिचा खून केला .