हैदराबाद : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर सेक्स टॉयच्या वापर करून एका विवाहित महिलेने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली. दरम्यान घडलेला प्रकार समजताच आरोपी महिलेच्या पतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. सुमलता (३२) असे या महिलेचे नाव असून सुमलाताने याआधीही काही मुलींवर बलात्कार केल्याची माहिती मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार सुमलताचे तिसऱ्यांदा लग्न झाले आहे. तिला पुरुषांसारखे राहायची आणि वागायची आवड होती. ती महिलासंबंधांकडे आकर्षीत होत असे. त्यासाठी ती पुरुषांचा आवाज काढून साई रमेश रेड्डी नाव सांगून अल्पवयीन मुलींशी फोन करून बोलत असे. घरात कुणीही नसताना ती त्या मुलींना घरी बोलावून त्यांच्यावर सेक्स टॉयचा वापर करून बलात्कार करत असे. त्यांनतर पीडित मुलींना याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत असे. मात्र, त्यातील एका पीडित मुलीने तिच्या पालकांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगून पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी याप्रकरणी सुमलताला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात सुमलताच्या घरून सेक्स टॉय तसेच पुरुषांचे वेगळे कपडे देखील सापडले आहेत. अटक केल्यानंतर सुमलताचे कारनामे तिच्या नवऱ्याला समजताच तिच्या पतीला जबरदस्त धक्का बसला . त्यातूनच त्याने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
Visit : bahujannama.com