बहुजननामा ऑनलाईन टीम – ‘स्टाईल’ या चित्रपटातून रिया सेन हिनं वयाच्या १९ व्या वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘झनकार बीट्स’ आणि ‘अपना सपना मनी मनी’ या सिनेमातून तिनं रसिकांची मनं जिंकली. मात्र बॉलीवुडमध्ये तिला फारसं यश मिळालं नाही. सुरुवातीपासूनच रियाकडे सेक्सी अभिनेत्री म्हणूनच पाहिलं जात होत, त्यामुळे त्याप्रकारच्याच भूमिका तिला मिळत गेल्या. मात्र त्याच त्या भूमिकांचा वीट आल्याने, अशा भूमिका मला नको अशी तीन जाहीर करुन टाकलं आहे. मात्र सोशल मीडियावर तुम्हाला तिने स्वतः शूट केले सेक्सी फोटो दिसतील.
दरम्यान आपण कायम मिनी स्कर्ट परिधान करावा, अंगप्रदर्शन करावं, असं हिंदी सिनेमा दिग्दर्शकांना वाटतं. मात्र रियाच्या मते या सगळ्या गोष्टींना सेक्सी म्हणत नाहीत. मात्र तरीही बॉलीवुडच्या सिनेमात काम करताना फार मजा आली नसल्याचं रियाला वाटतं. त्यामुळेच तिने आपला मोर्चा इतर भाषिक सिनेमाकडे वळवला. बंगाली दिग्दर्शकांनी आपल्याला चांगल्या भूमिका ऑफर केल्या. त्या भूमिकांमध्ये काही तरी वेगळं सांगण्यासारखं होतं. अशा प्रकारच्या भूमिका मला आता करायला आवडतील असं रियानं म्हटलं आहे.
बॉलीवु़डमध्ये चुकीच्या वेळी एंट्री मारली असंही तिला वाटतं. ज्यावेळी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं त्यावेळी लहान होते. इथलं वातावरण, लोक यांची माहिती नव्हती. मात्र काळानुरुप वयानुसार आपल्यात बदल झाले असून चांगलं काय, वाईट काय याची समज आल्याचं तिने सांगितले आहे.