चंदीगड : वृत्त संस्था – विरोधी पक्षांमध्ये सध्या पक्षपुटीचे प्रमाण वाढीस लागले आहे, त्यात काँग्रेसला जरा जास्त अडचणींना सामोरे जावे लागत आहे. योग्य नेतृत्व नसल्याने गेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला चांगलाच फटका बसला. त्यात आता विधानसभेच्या तोंडावर पक्षांतरसुद्धा मोठया प्रमाणात होत आहे. त्यात आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असणाऱ्या आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डा हे वेगळा पक्ष घोषित करण्यासही शक्यता वर्तवली जात आहे, रविवारी हुड्डा समर्थकांच्या मोठ्या जाहीर सभेला संबोधित करणार आहे.
भूपेंद्रसिंग हुड्डा यांनी शनिवारी काँग्रेस मधील अनेक मोठ्या दिगज्जांची दिल्ली येथे भेट घेतली. परंतु पक्षाच्या सध्याच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी याची भेट न घेतल्याने चर्चेला उधाण आलं आहे. त्यासाठीच हुड्डा आज रोहतक येथे महापरिवर्तन रँलीला संबोधित करणार आहेत. यावेळी ते एकतर नव्या पक्षाची घोषणा करतील किंवा राज्यातील इतर पक्षांक्षी हाथ मिळवणी करत आघाडी करून निवडणूक लढवतील, अशी चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पक्षाचे नेतृत्व करण्यास हुड्डा हे अनुकूल नाहीत , अशी चर्चा कानावर पडली , काँग्रेसला जर विजय हवा असेल तर नवीन नेतृत्वांना संधी देणे गरजेचे आहे. परंतु दीर्घकाळापासून पक्षात असणारे भूपेंद्रसिंग हुड्डा यांनीच विधानसभा निवडणुकीचे नेतृत्व करावे आणि मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, असा हुड्डा यांच्या समर्थकांना आग्रह आहे. त्यामुळे हुद्दा काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.