औरंगाबाद बहुजननामा ऑनलाईन – औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असायला हवे अशी इच्छा असणाऱ्या शिवसैनिकाने औरंगाबाद या नावावर ‘संभाजीनगर’ अशी पाटी लावल्याने काल (रविवारी) रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. काल एका शिवसेनेच्या कार्यकर्त्याने औरंगाबाद रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म नंबर २ वरील पाटीवर पिवळा रंग टाकून त्यावर संभाजीनगर अशी पाटी लावली. ही पाटी लावणाऱ्याने आपण शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं आहे.
रेल्वे स्थानकावरील हा प्रकार लक्षात येताच एमआयएमचे काही कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर पोहचले आणि त्यांनी ही बाब रेल्वे पोलिसांना सांगितली.या प्रकारामुळे स्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला पण पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.एमआयएमच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संभाजीनगर नावाची पाटी तात्काळ हटवली असून हे कृत्य करणाऱ्यवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हंटले आहे.
औरंगाबादचं /संभाजीनगर
औरंगाबाद शहराचं नामकरण करून ते संभाजीनगर करण्यात यावं, या मागणीसाठी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून आग्रही आहे. हा मुद्दा आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांत गाजला आहे.या मागणीवरून औरंगाबदमध्ये अनेकदा वाद झाला आहे.