Shivsena UBT Vs MNS In Beed | बीडमध्ये मनसे अन् शिवसेनेत तुफान राडा; राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर फेकल्या सुपाऱ्या

August 10, 2024

बीड: Shivsena UBT Vs MNS In Beed | राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा समाज (Maratha Samaj) आणि ओबीसी समाज (OBC Samaj) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोलापूर येथे बोलताना त्यांनी कोणालाही आरक्षणाची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते.

https://www.instagram.com/reel/C-c3SLQpuK-/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

त्यानंतर मराठा आंदोलक संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरेंकडून त्यांच्या वक्तव्याबाबत जाब विचारला जात आहे. राज ठाकरे यांच्या बीड दौऱ्यादरम्यान त्यांचा ताफा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या देखील फेकण्यात आल्या आहेत.

इतकेच नाही तर राज ठाकरे यांच्या समोरच त्यांच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्याचे समोर आले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली. राज ठाकरे सुपारी घेऊन बीडमध्ये आले असा आरोप करत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह कार्यकर्त्यांनी यावेळी गोंधळ घातला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे बीडमध्ये दाखल होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा राडा देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

राज ठाकरे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज त्यांचा दौरा बीडमध्ये होता. जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती. याच दरम्यान राज ठाकरे दाखल होताच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे याठिकाणी पोहोचताच त्यांना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेरलं.

अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांना बाजूला करत राज ठाकरेंचा ताफा पुढे गेला. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळेच हा राडा झाला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला असून पोलीस यंत्रणा सतर्क होऊन पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.