Shivsena UBT Leader On Dhananjay Munde | धनंजय मुंडे अजित पवारांच्या गाडीतून फडणवीसांच्या भेटीला, भास्कर जाधव यांचे टीकास्त्र; म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा होती, मात्र…’

नागपूर: Shivsena UBT Leader On Dhananjay Munde | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) राज्यात चांगलेच तापल्याचे दिसत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड (Valmik Karad) यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप केला जात आहे. यावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांना चांगलेच धारेवर धरले आहे. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे विधिमंडळात दिसलेच नाहीत.
दरम्यान आज देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर चहापानासाठी विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात जाण्याआधी धनंजय मुंडे हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यानंतर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी एकाच गाडीतून प्रवास करत ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरी दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी टीकास्त्र सोडले आहे.
भास्कर जाधव म्हणाले, सरकारकडून मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची अपेक्षा होती, धनंजय मुंडे यामुळे भीतीने आले नसावे. मात्र, आता त्यांना खात्री झाली असावी की आपल्याला वाचवलं जाईल त्यामुळे ते आले असावेत”, असे भास्कर जाधव यांनी म्हंटले आहे.
Comments are closed.