मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेचा (Shivsena) पारंपारिक दसरा मेळावा (Dasra Melava) नेहमीप्रमाणे शिवतीर्थावर (Shivtirtha) तर शिंदे गटाचा (Shinde Group) मेळावा बीकेसीच्या मैदानावर (BKC Ground) होणार आहे. दोन्ही बाजूकडून मेळाव्यांची जय्यत तयारी सुरू आहे. शिंदे गटाने तर प्रत्येक आमदाराला किती माणसं आणायची याचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे दोन्हीकडे चढाओढ सुरू आहे. आता दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीच्या टीझरद्वारे (Teaser) एकमेकांना लक्ष्य केले जात आहे. शिंदे गटाने एक नेता, एक नाथ…या कॅप्शनचा टीझर प्रसिद्ध केल्यानंतर शिवसेनेने (Shivsena) त्यास निष्ठेचा सागर उसळणार म्हणत, आपला टीझर प्रसिद्ध केला असून शिवसैनिकांना (Shiv Sainik) मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेनेने (Shivsena), निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची (Maharashtra) ताकद दिसणार या टॅगलाईनसह व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओत बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो,
बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र, बाळासाहेबांचा आवाज…
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि फडकणारा भगवा ध्वज अशी दृश्य दाखवली आहे.
शिवसेनेने या टीझरसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून यात लिहिले आहे की, एक नेता, एक झेंडा, एक मैदान…
शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा, शिवाजी पार्क (Shivaji Park) दादर येथे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिवसेनेनचा टिझर शेअर करत शिवसैनिकांना वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या!, असे आवाहन केले आहे.
एक नेता, एक झेंडा, एक मैदान…
शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!
स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज पार्क (शिवतीर्थ), दादर
५ ऑक्टोबर २०२२, सायं. ६.३० वा. pic.twitter.com/FbulJpw2mA— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 30, 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान शिंदे गटाने आपल्या टीझर रिलिज केला असून यात ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य,
एक नाथ‘ अशी टॅगलाईन दिली आहे.
टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिवसैनिकांना आवाहन करण्यात आले आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा, हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार असे म्हणत बी. के. सी मैदानात सायंकाळी पाच वाजता हा दसरा मेळावा होणार असल्याचे म्हटले आहे.
Web Title :- Shivsena | the sea of loyalty will rise uddhav thackeray also responded to the eknath shinde group with a teaser the saffron roar of the gathering
हे देखील वाचा :