Shivsena Thackeray Group Leader On Devendra Fadnavis | ‘फडणवीसांना राजकारणातून संपवण्यासाठी भाजपाच सक्रिय, तावडे- गडकरींना पुढे केले जातेय’, शिवसेना नेत्याचं मोठं विधान
लातूर: Shivsena Thackeray Group Leader On Devendra Fadnavis | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत (Latur News). त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.
“भाजपातीलच काही लोक फडणवीसांना संपवण्यासाठी नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि विनोद तावडे (Vinod Tawade) यांचं नाव समोर आणत आहेत”, असे विधान सुषमा अंधारे यांनी केलं आहे. या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून संपवण्यासाठी भाजपाच सक्रिय झाली आहे. दिल्लीत एका तासात नवनीत राणा यांना भेट मिळते, पण फडणवीसांना वेटिंग वर ठेवलं जातं. भाजपातलेच काही लोक नितीन गडकरी आणि तावडे यांचं नाव समोर आणत आहेत.
राज्याच्या राजकारणात आता देवेंद्र फडणवीस यांनी वाढवलेला भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवील की काय ही परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ज्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवलं, तेच शिंदे आता फडणवीसांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेक कृत्या चालू आहेत हे बऱ्यापैकी लोकांच्या लक्षात येत आहे”, असं वक्तव्य देखील सुषमा अंधारे यांनी केले आहे.