Shivsena Thackeray Group First List For Assembly | शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर, आदित्य ठाकरेंसह 65 जणांचा समावेश; जाणून घ्या

मुंबई: Shivsena Thackeray Group First List For Assembly | विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी काहीच दिवस बाकी आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. महायुतीतील पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये मात्र जागावाटपाची चर्चा सुरु होती. ही चर्चा अंतिम टप्प्यात येताच शिवसेना ठाकरे पक्षाने आता ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
यामध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना पुन्हा एकदा वरळीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर वसंत गिते -नाशिक मध्य, के पी पाटील-राधानगरी , दीपक आबा साळुंखे पाटील – सांगोला, कैलास पाटील-धाराशिव, नितीन देशमुख-बाळापूर, शंकरराव गडाख – नेवासा यांसह ६५ जणांचा या यादीत समावेश आहे.
Comments are closed.