मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – खरी शिवसेना (Shivsena) कुणाची हे सिद्ध करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटला (Eknath Shinde Group) कागदोपत्री पुरावे (Documentary Evidence) सादर करण्याचे आदेश दिले आहे. हे पुरावे सादर करण्यासाठी 8 ऑगस्टची मुदत दिल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि बंडखोरांवर घणाघाती टीका केली आहे. आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, मात्र काही दिवसांनी राज्यातील जनता तुमची गाढवावरुन धिंड काढणार, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
संजय राऊत म्हणाले, निवडणूक आयोग किंवा अन्य यंत्रणा काय आहेत हे सांगण्याची गरज नाही. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेनेवर (Shivsena) दिल्लीच्या आदेशाने, महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या आदेशानं ही वेळ आणली आहे, बाळासाहेबांचा आत्मा वरुन पहतोय. आज तुम्ही घोड्यावर बसलेले आहात, उद्या लोक तुमची गाढवावरुन धिंड काढल्याशिवाय राहणार नाही, माझे शब्द लिहून ठेवा, असे राऊत म्हणाले.
तुम्हाला राज्यातील जनता राजकारणातून उठवणार आहेच. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) दौऱ्याला शिवसैनिकांचा जोरदार प्रतिसाद मिळतोय. हे पैसे दिलेले फोडलेले लोक नाहीत. बंडखोर आम्ही उठाव केल्याचे सांगत आहेत, पण कसला उठाव? या उठाव मधील उठा म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहे, हे तुम्हाला उठवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.
शिवसेना कुणाची पुरावे द्यावे लागणे हे दुर्दैवी असल्याचे सांगत, संताप व्यक्त केला.
ते म्हणाले, शिवसेना कुणाची हे पुरावे सादर करण्याची वेळ आणावी, यासारखं महाराष्ट्रचं दुर्दैव नाही.
तुम्ही वेगळा गट तयार केला आहे. तुम्ही तुमच्या नवीन संसारात सुखाने रहा.
पण दिल्लीश्वरांना शिवसेना संपवायची आहे. त्याचं हत्यार म्हणून यांना वापरलं जातंय. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत.
ही बाळासाहेबांची सेना आहे. आज आमच्यावर पुरावे सादर करण्याची वेळ आणताय,
हे पाप तुम्हाला फेडावं लागेल, असा घणाघात संजय राऊतांनी केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shivsena | shivsena public eknath shinde group will kick the ass uddhav thackeray will lift them from politics mp sanjay raut
हे देखील वाचा :
Pune Rural | पुणे जिल्ह्यात (ग्रामीण) 5 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू