Shivsena Shinde Group Leader On Anand Dighe | शिंदे गटाच्या बड्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले – ‘आनंद दिघे यांना मारण्यात आले, त्यांचा घातपात केला’

Anand Dighe

मुंबई : Shivsena Shinde Group Leader On Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघे यांना मारण्यात आले होते त्यांचा घात झाला होता असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये दिघे उपचार घेत होते ते कायमचे बंद का करण्यात आले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दिघेंचा मृत्यू का झाला? याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना शिरसाट यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “ठाण्यात प्रत्येकजण दिघे यांचा घातपात झाल्याचा आरोप करतात. दिघे यांना डिस्चार्ज दिला जाणार होता. मात्र डिस्चार्ज द्यायच्या आधीच त्यांचा मृत्यू कसा झाला?”, असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले, ” गेल्या अनेक वर्षापासून दिघे यांचा मृत्यू कसा झाला याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे या प्रकरणात चौकशी करण्यात यावी”, अशी माझी मागणी असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.

तसेच इतके वर्ष झाले ते हॉस्पिटल सुरू का झाले नाही, ही सर्वांच्या मनात शंका कायम आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये नेत्याचे मृत्यू झाले आहेत. मात्र ते हॉस्पिटल कधीही बंद झाले नाहीत. मात्र इथेच असे का झाले?, असा सवाल त्यांनी केला.