मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पहाटे झालेल्या शपथविधीवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली होती. 54 आमदारांच्या (MLA) सहीचे पत्र (Letter) अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ड्रॉवरमधून (Letter) चोरले, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सामनाच्या (Samana) संपादकीयमधून (Editorial) उत्तर दिलं आहे.
ते पत्र चोरण्यास कारण काय ?
संजय राऊत यांनी सामनाच्या संपादकीय मधून चंद्रकांत पाटील यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. यासंबंधी संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ते पत्र (Letter) चोरण्यास कारण काय ? पत्र चोरल्याचा आरोप भाजपने (BJP) केला आहे.
ज्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा जुनी जळमटं काढून फेकून द्यायला हवी होती.
परंतु भाजपचे सहकारी त्यातून बाहेर पडलेले नाहीत.
त्यांच्या मनाला हा विषय फार लागला आहे, असा टोला त्यांनी लगावला.
चोरीचा माल विकत घेणे गुन्हा
चोरीचा माल विकत घेणं हा सुद्धा गुन्हा (Crime) आहे.
एखाद्या नेत्याने शरद पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र (Letter) चोरलं असेल तर त्याच्या आधारे सरकार स्थापन करणं आणि चोरीचा माल विकत घेणं हा फार मोठा गुन्हा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हा विश्वासघात असून अनैतिक
भाजप नेत्यांनी शिवसेनेने विश्वासघात केल्याची टीका केली असून यावर बोलताना राऊत म्हणाले, आम्हालाही विश्वासघात केल्यानंतर वाईट वाटतं.
उद्धव ठाकरेंना भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेना प्रमुखांच्या खोलीत मुख्यमंत्रीपदाबाबत शब्द दिला होता, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
तो शब्द पाळला गेला नाही हा विश्वासघात असून अनैतिक आहे.
ती वेदना आजही टोचत आहे. पण आम्ही विसरुन गेलो आहे.
त्यामुळे भाजपने सुद्धा पत्र, शिवसेनेने फसवलं यातून बाहेर पडलं पाहिजे. एक विरोधी पक्ष (Opposition) म्हणून खंबीर नेतृत्व उभं करुन काम केलं पाहिजे.
कृपया हे देखील वाचा:
खासदार नवनीत राणांना मोठा झटका, मुंबई HC कडून जात प्रमाणपत्र रद्द, खासदारकी धोक्यात
अँटी फंगल इंजेक्शनची काळया बाजारात विक्री
लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत
बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया
धक्कादायक ! सावत्र आईकडून अल्पवयीन मुलाचा छळ, रागाच्या भरात गुप्तांगाला दिले चटके