सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाइन – Shiv Sena MP Vinayak Raut | शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) यांनी भाजप नेते (BJP) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘आजच नव्हे तर भविष्यात कधीही नारायण राणे अंगावर आले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. सिंधुदुर्गात राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही, असा जोरदार हल्लाबोल विनायक राऊत यांनी केला आहे.
शिवसेना नेते विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) हे कुडाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. त्यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी म्हटलंं आहे की, नारायण राणेंनी हिमंत असेल तर पुन्हा एकदा नाईक यांच्याविरोधात उभे राहावे, कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवून दाखवावी. त्यांचे डिपॉझिट जप्त नाही केले तर शिवसेनेचे नाव सांगणार नाही. असं राऊत यांनी म्हटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले, दोनदा नारायण राणेंच्या पोराचा पराभव झाला, एकदा त्यांचा झाला. सिंधुदुर्गात नारायण राणेंसारख्या गद्दारांची कधीचं डाळ शिजणार नाही हे जिल्ह्याने दाखवून दिल्याचे विनायक राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, राऊतांच्या या घणाघाती टीकेनंतर आता नारायण राणे यांच्याकडून काय प्रत्युत्तर येतं याकडे लक्ष लागून आहे.
Web Title : Shivsena MP Vinayak Raut | shivsena mp vinayak raut criticizes bjp leader narayan rane.