मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ‘राम मंदिराचा मुद्दा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ७ मार्चला अयोध्येत रामजन्म भूमीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. तसेच शरयू नदीची आरतीही करणार,’ अशी माहिती दिली आहे. आगामी काळात शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सामना होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
याला कारण असे की महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करत असल्याचे दिसत आहे. मनसे स्थापन करत राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा समोर आणला होता. पण आता त्यांनी त्यांचा मोर्चा हिंदुत्वाकडे वळवला असून आता उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यामुळे पुन्हा एकदा या दोन पक्षांमध्ये आता आरोप-प्रत्यारोप होणार असल्याचेही दिसत आहे.
तसेच मागील वर्षी लोकसभा निवडणुक होण्याअगोदर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वात प्रथम अयोध्येचा दौरा केला होता. तेव्हा सगळ्यांचे लक्ष त्या दौऱ्याकडे होते. नंतर विधानसभा निवडणूक जिंकल्यावर सर्व विजयी खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेतले होते. पण आता तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे हे राम लल्लाचे दर्शन घ्यायला जाणार आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली असली तरी त्यांनी हिंदुत्व सोडलेले नाही, हे दाखवण्यासाठीच शिवसेना परत अयोध्येला जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Visit : bahujannama.com