Shivsena | खरी शिवसेना कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रातल्या राजकारणात मागील काही दिवसांपासून खरी शिवसेना (Shivsena) कोणाची असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) शिवसेना आमची असल्याचे म्हणत आहे. तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आमची खरी शिवसेना (Shivsena) असल्याचे म्हणत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्या हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) गेले आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना महत्वाचे आदेश दिले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात शिवसेनेच्या (Shivsena) मालकीवरुन सुरु असलेला वादावर केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच फैसला घेणार आहे. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ (Legislature) आणि संसदेत (Parliament) आपल्याकडे बहुमत (Majority) असल्याचा दावा करत संपूर्ण शिवसेना पक्षावरच आपला दावा सांगितला होता. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushya Ban Symbol) हे आपल्याला मिळावे, अशी विनंती केली होती. तर दुसरीकडे शिवसेनकडूनही निवडणूक आयोगाकडे याबाबत कॅव्हेट दाखल केले होते.
त्यानंतर निवडणूक आयोग ॲक्टिव्ह झाला असून शिवसेना नेमकी कुणाची याचा सोक्षमोक्ष लावला जाणार आहे.
त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे (Documentary Evidence) सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आयोगाने 8 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे.
त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणावर सुनावणी करणार असल्याचे समजते.
निवडणूक आयोगाचा कौल काय असणार, यावर उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shivsena | election commission (EC) seeks proof documents from uddhav thackeray shivsena and eknath shinde group
हे देखील वाचा :
National Film Awards 2022 | अजय देवगन, साउथ स्टार सूर्याने जिंकले ‘बेस्ट अॅक्टर अवॉर्ड’
Comments are closed.