मालेगाव : बहुजननामा ऑनलाइन – येथे शनिवारी रात्री शिवसेना नगरसेविका तथा प्रभाग क्रमांक एकच्या माजी सभापती कविता किशोर बच्छाव कोरोनाने निधन झाले. काही दिवसांपूर्वी बच्छाव यांच्यात कोरोनाची लक्षणे लागली होती.
त्याची तीव्रता कमी असल्याने त्यांच्यावर गृहविलगीकरणातच उपचार सुरू होते. त्यांना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक अस्वस्थ वाटू लागले. आप्तांसह कृषिमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ त्यांना सामान्य रुग्णालयात हलविले. रुग्णांलयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.