Shivaji Nagar Assembly Election 2024 | अपक्ष उमेदवार मनीष आनंद यांच्या प्रचार दौऱ्याला गोखलेनगर परिसरात मोठा प्रतिसाद; म्हणाले – ‘जनता पाठीशी खंबीर उभी राहील असा विश्वास’

November 11, 2024

पुणे: Shivaji Nagar Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात महाविकास आघाडीत बंड पाहायला मिळालं. पर्वती मतदारसंघातून आबा बागूल तसेच शिवाजीनगर मतदारसंघातून मनीष आनंद (Manish Anand) यांनी काँग्रेस पक्षातून बंड पुकारलं आहे.

त्यामुळे आता शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, काँग्रेसकडून दत्ता बहिरट तर अपक्ष उमेदवार मनीष आनंद निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान तिन्ही उमेदवारांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरु आहे.

दरम्यान, मनीष आनंद यांनी गोखलेनगर परिसरात नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी त्यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी काही अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. आगामी काळात या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन मनीष आनंद यांनी दिले.

मनीष आनंद म्हणाले, ” आम्ही केलेली कामे जनतेसमोर आहेत. त्याच कामाच्या आधारे जनतेला मी आशीर्वाद मागत आहे, यावेळी जनता पाठीशी खंबीर उभी राहील”, असा विश्वास असल्याचं मनीष आनंद यांनी सांगितलं.