नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. मोदींनी आपल्या ट्विटरवरून महाराजांचे अभिवादन केले आहे. त्यांनी भारत मातेचे महान सुपूत्र, महान प्रशासक, धैर्य आणि शौर्याचे प्रतिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे, असे लिहिले आहे.
महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!
Bowing to one of the greatest sons of Mother India, the embodiment of courage, compassion and good governance, the exceptional Chhatrapati Shivaji Maharaj on his Jayanti. His life continues to motivate millions. pic.twitter.com/zrnpT5D5oI
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2020
तसेच दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शिवाजी महाराजांची वैश्विक जयंती साजरी झाली असून या जयंतीसाठी कार्यक्रमात बारा देशांचे राजदूत सहभागी झाले होते. त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमात बल्गेरियाच्या राजदूत इलेन वोरा यांनी मराठीत भाषण केल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.
तसेच सोबत नाशिकचे ढोल आणि लेझीम पथकही होते. लष्कराच्या मराठा रेजिमेंटचा बँड महाराष्ट्र सदनात वाजवण्यात आला असताना शिवजन्म सोहळ्यासाठी शिवाजी महाराजांचा पाळणाही सजविण्यात आला होता.