• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

विदर्भातील वाघाची राजकीय कारकीर्द अंधारात ?

by Balavant Suryawanshi
March 1, 2021
in मुंबई, राजकीय
0
Sanjay Rathore

Sanjay Rathore

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड यांची राजकीय दमदार वाटचाल रोखली गेली आहे. वयाच्या ५० व्या वर्षी चार वेळा आमदार, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीदेखील ते होते. मात्र आता सर्वालाच कलाटणी मिळाली असून संजय राठोड यांच्या राजकीय वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संजय राठोड हे मूळचे यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव मतदारसंघातील पहुर इजार या गावचे. आदिवासींसाठी पूर्वीचा दारव्हा मतदारसंघ राखीव असल्याने राठोड यांनी राजकीय कारकिर्द घडविण्यासाठी येथेच जम बसविला. त्यानंतर मतदारसंघ फेररचनेनंतर झालेल्या दिग्रस मतदारसंघातून निवडून येतात. गेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा दोन उमेदवारांचे आव्हान मोडत मोठा विजय संपादन केला होता. पक्षांतर्गत काही त्यांचे विरोधक असून त्यामध्ये यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे नाव विरोधकांच्या यादीत पाहिल्या स्थानी आहे. असे असले तरी राठोड यांनी पक्षातील आणि बाहेरच्या विरोधाचा सामना करीत राजकीय वाटचाल सुरु ठेवली होती.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री म्हणून काम पहिले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या विदर्भातील चार आमदारांपैकी राठोड यांना वनखात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. वनखाते सांभाळत असताना काही निर्णयांमुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. परंतु आत्महत्या त्यांचे नाव जोडले गेले आणि सर्वच परिस्थिती बदलून गेली. पूजाच्या आत्महत्येच्या एक दिवस आधी पूजा अरुण राठोड या तरुणीचा यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. या दोन्ही पूजा एकच असल्याचे म्हटले गेले आणि संजय राठोड यांच्या अडचणी अधिकच वाढल्या. भाजपने या प्रकरणावरून पकडले होते. राठोड हे यवतमाळचे पालकमंत्रीदेखील होते.

बीड जिल्ह्यातील परळीला राहणारी पूजा चव्हाण ही टिकटॉक स्टार म्हणून लोकप्रिय होती आणि तिचे यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित १२ ऑडिओ क्लिप वरून तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले. त्यानंतर राठोड यांनी या संदर्भात कोणताही खुलासा दिला नाही. त्याचबरोबर वनविभागाच्या एकाही बैठकीला तसेच मंत्रिमंडळ बैठकीलाही ते हजर नव्हते. २३ फेब्रुवारीला ते बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी संस्थानमध्ये दर्शनासाठी गेले, तेव्हा त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. त्यावेळी त्यांनी पूजा आत्महत्येप्रकरणी आरोप फेटाळत विरोधक घाणेरडे राजकारण करीत असल्याचा आरोप केला होता. ज्या वेळी त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा त्यांच्या सोबत परिवहन मंत्री अनिल परब, खासदार अनिल देसाई होते.

दरम्यान, रविवारच्या राजीनाम्याने विदर्भातील शिवसेनेचा हा वाघ जायबंदी झाला आहे. राजीनामा दिला तरी राठोड यांच्यामागचे शुक्लकाष्ट संपण्याची शक्यता नाही. कारण पोलीस चौकशीचा ससेमिरा कायम असेल.

Tags: banjara samajDevendra Fadnavis GovernmentForest Minister Sanjay RathoreMahavikas Aghadi GovernmentMP Anil DesaiMP Bhavana GawlimumbaiPooja Arun RathorePooja ChavanPooja Chavan suicide caseRalegaon constituencyresignationSanjay RathoreShiv Senasocial mediaTransport Minister Anil Parabyavatmalखासदार अनिल देसाईखासदार भावना गवळीदेवेंद्र फडणवीस सरकारपरिवहन मंत्री अनिल परबपूजा अरुण राठोडपूजा चव्हाणपूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणबंजारा समाजमहाविकास आघाडी सरकारमुंबईयवतमाळराजीनामाराळेगाव मतदारसंघाराष्ट्रवादीवनमंत्री संजय राठोडशिवसेनासंजय राठोडसोशल मीडिया
Previous Post

मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली नाही; ‘जैश उल हिंद’ संघटनेच्या खुलाशाने नवा संभ्रम

Next Post

सामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन

Next Post

सामान्य जनतेला आजपासून दिली जाईल कोरोना लस, खासगी हॉस्पीटलमध्ये 250 रुपयांना पहिला डोस, जाणून घ्या कसे करायचे रजिस्ट्रेशन

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Sanjay Rathore
मुंबई

विदर्भातील वाघाची राजकीय कारकीर्द अंधारात ?

March 1, 2021
0

...

Read more

कोमॉर्बिड असलेल्या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक; डॉक्टरांनी दिला इशारा

6 days ago

पेंशन फंड मॅनेजर्सच्या फीमध्ये वाढ; जाणून घ्या PFMs आणि ग्राहकांना ‘कसा’ होईल फायदा

6 days ago

Pune : लोहगाव परिसरात जमीनीच्या वादातून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, 8 जणांविरूध्द FIR दाखल

9 hours ago

‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार करताना डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात, 1200 चे इंजेक्शन 25 हजारांना विकत होता

8 hours ago

सोनं-चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

4 days ago

Corona Vaccine घेण्यासाठी गेलेल्या 3 महिलांना दिली Anti Rabies लस, आरोग्य विभागात प्रचंड खळबळ

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat