शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या बैठकीलादेखील ते आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात असल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली. एनडीएचा दोन नंबरचा मित्र पक्ष असलेली शिवसेना युतीतूनबाहेर पडली आहे.
दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीत शिवसेना जाणार नसल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली होती. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यात आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत शिवसेनेचे खासदार उपस्थित नसल्याने शिवसेना युतीतून बाहेर पडल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली.