मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मनी लॉंड्रिंगप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Saranaik) यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मनी लॉंड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कारवाईचा बढगा उगारला होता. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने ED ला कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुुळे आ. सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ED ने 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईक यांच्यासह मुलगा विहंग सरनाईक यांचे घर, कार्यालय, हॉटेलसह 10 ठिकाणी छापेमारी केली होती. दिल्ल्लीतून आलेल्या इडीच्या पथकाने आ. सरनाईक यांना चौकशीसाठी वारंवार समन्स बजावले होते. त्यानंतर इडीच्या कारवाई विरोधात आ. सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने सरनाईक यांची बाजू उचलून धरत त्यांना दिलासा दिला आहे.
न्यायालयाने ED ला तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. एक प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तूर्तास कारवाई नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कुठलीही कारवाई करू नये, असे आदेशात दिले आहे. ED सरनाईक कुटुंबीयाला चौकशीसाठी बोलावू शकते, मात्र त्यांना अटक करू शकत नाही, असे आदेशात म्हटले आहे.