Video : पोलिसांवर हात उचलणार्यांना भर चौकात चोपा : नितीन नांदगावकर

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – देशभरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, पोलीस तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दिवसरात्र झटत आहे. मात्र, कोरोना संसर्गा सारख्या गंभीर प्रसंगावेळी काही समाजकंटकांकडून त्यांच्यावरती हल्ले होण्याचे प्रकार होत असल्याचं दिसत आहे. मुंबईतील कुर्ला परिसरातील पाईपलाईन येथे काही लोकांनी पोलिसांवर हात उचलून त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हीडीओ समोर आला होता. यावरती बोलताना शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी अशा समाजकंटकांना भर चौकात चोप दिला पाहिजे, असं म्हटलं आहे.
“पोलीस हे माझा अभिमान असून पोलिसांवर कोणीही हात उचलू नये. काही मुस्लिम समाजातील समाजकंटक हे सतत हौदोस घालत असतात आणि आपले पोलीस बांधव आपले कर्तव्य समजून सगळं निमूटपणे सहन करत असतात,” असं नांदगावकर म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी पोलिसांना मोकळे हात देण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे.
पुढं बोलताना ते म्हणाले ” एकीकडे जनतेची सेवा करताना कोरोना संसर्गाची लागण होऊन काही पोलीस बांधव शहीद झाले. काही विकृत प्रवृत्तींमुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या समाजकंटकांना आवरलं पाहिजे. नाहीतर हे समाजकंटक कोरोना संसर्गापेक्षा घातक ठरतील,” असं त्यांनी यावेळी म्हटलं. “ज्या मुस्लिम समाजातील समाजकंटकांना कायदा सुव्यस्थेचं पालन करायचं नसेल ते पाकिस्तानात जाऊन का राहत नाहीत? असा प्रश्न विचारत त्यांची महाराष्ट्राला गरज नसल्याचंही ते म्हणाले. “जे पोलिसांच्या वर्दीला हात लावतील त्यांना दिसता क्षणी चोप द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असं नितीन नांदगावकर या व्हिडीओ मध्ये म्हणत आहे.
एनपी न्यूज 24 नेटवर्क
Comments are closed.