मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याने शिवसेना न्यायालयात जाणार असल्याचे सांगण्यात येत असून, यासाठी शिवसेना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी काँग्रेस नेता न्यायालयात लढताना दिसणार आहे.
महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा गुंता अधिकच वाढत चालला आहे. राज्यपालांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. पण, त्यापूर्वीच राष्ट्रपती राजवटीच्या तयारीला सुरवात झाली आहे. शिवसेनेने राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सरकार स्थापन करु न शकल्याने पक्षाकडून वाढीव मुदत मागण्यात आली होती. परंतु, ती मुदत राज्यपालांकडून नाकारण्यात आली असून या निर्णयाच्या विरोधातच शिवसेना न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी रात्री ८.३० पर्यंत मुदत दिली आहे. राज्यपालांकडे शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी ३ दिवसांची मुदत मागितली होती. परंतू राज्यपालांनी याला अनुमती दिली नाही. त्यामुळे शिवसेना न्यायालयात जाऊ शकते. न्यायालयात शिवसेनेची बाजू काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि वकील कपिल सिब्बल मांडणार आहे.
Visit : bahujannama.com