हिमाचल प्रदेश (पौडीवाला) : वृत्तसंस्था – 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा सण देशभर साजरा केला जातो. या निमित्ताने आम्ही तुम्हाला भगवान शिवाशी संबंधित असलेल्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे रोचक प्रसंग घडलेले आहेत. आज आपण पौडीवालाच्या शिव मंदिराबद्दल वाचणार आहोत. असा आख्यायिका आहे की रावणाने अमरत्व मिळवण्यासाठी येथे दुसरी ‘पौडी’ (सीढी) बनविली. हे ठिकाण चंदीगडपासून 70 किलोमीटर आणि नाहनपासून 6 किलोमीटर अंतरावर आहे.
या शिव मंदिराचा इतिहास लंकाधिपती रावणाशी जोडला गेल्याचे दिसून येते. असे मानले जाते की रावणाने अमरत्व मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. तपस्येमुळे संतुष्ट भगवान शिव शंकरांनी त्याला एक वरदान दिले की, जर त्याने एका दिवसात पाच पौडी निर्माण केल्या तर तो अमर होईल.
वरदान मिळाल्यानंतर रावणाने हरिद्वारमध्ये पहिली पौडी बांधली, ज्याला आता ‘हर की पौड़ी’ म्हटले जाते. दुसरी पौडीवाला, तिसरी चुडेश्वर महादेव आणि चौथी पौडी किन्नर कैलासमध्ये बनविली. यानंतर रावणाला झोप आली. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. त्यानंतर रावणाची अमरत्वाची इच्छा अपुर्ण राहिली. असे मानले जाते की पौडीवाला येथे असलेल्या या शिवलिंगात शिवशंकर असून येथे येणार्या सर्व भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
दुसर्या अन्य कथेनुसार, जेव्हा त्यांनी भगवान विष्णूची तपश्चर्या केली तेव्हा मृकंड ऋषिला त्यांनी मुलाचे वरदान देऊन सांगितले की, याचे वय फक्त 12 वर्ष असेल. या वरदानाचा परिणाम म्हणून मार्कंडेय ऋषी जन्माला आले. ज्यांनी अमरत्व मिळवण्यासाठी भगवान शिव यांच्या तपश्चर्येमध्ये सतत महामृत्युंजय मंत्र जप केला.
१२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर, जेव्हा यमराज त्याला घ्यायला आला, तेव्हा त्याने तेथील शिवलिंगांना हातात घेतले ज्यामुळे तेथे शिव प्रकट झाले. शिवाने मार्कंडेय ऋषीला अमरत्व दिले. तिथून मार्कंडा नदीचा जन्म झाला. यानंतर भगवान शिव शंकर पौडीवाला येथे असलेल्या या शिवलिंगात विलीन झाले.