शिर्डी : बहुजननामा ऑनलाइन – शिर्डी शहर (Shirdi Crime) आज गोळीबाराच्या (firing) घटनेने हादरुन गेले आहे. शिर्डी शहरातील (Shirdi Crime) लक्ष्मीनगर भागात एका तरुणावर अज्ञात व्यक्तीने (unknown person) गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
ही घटना लक्ष्मीनगर (Laxminagar) भागातील एका खासगी पार्किंगमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गोळीबाराच्या आवाजाने नागिरकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.
गोळीबाराच्या या घटनेत सूरज ठाकूर (Suraj Thakur) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना घडताच स्थानिक नागरिकांनी सूरजला तात्काळ शिर्डीतील (Shirdi Crime) साईबाबा सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयात (Saibaba Super Specialist Hospital) उपचारासाठी दाखल केले आहे.
भल्या पहाटे गोळीबार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण असून जखमी सूरज याच्यावर उपचार केले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्यातील (Shirdi Police Station) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. हल्ल्यामागच्या कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराचा शोध सुरु केला आहे. तसेच पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत. पुढील तपास शिर्डी पोलीस करीत आहेत.
Web Title :- Shirdi Crime | young man injured in gun firing in shirdi
Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने मित्रांनीच मारहाण करुन लुटले; कात्रज परिसरातील घटना
Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा टाकणारी 6 जणांची टोळी गजाआड