मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Shinde Fadnavis Govt – Shivsena Uddhav Thackeray | शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाकरे स्टाईलने कसा समाचार घेतात, याकडे राज्यभरातील शिवसैनिकांसह जनतेचे सुद्धा लक्ष लागलेले असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मैदानच उपलब्ध होऊ नये, अशी खेळी केली आहे. यामुळे शिवसेनेच्या नेत्यांसह शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मैदानासाठी परवानगी देताना प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून कोंडी केली जात असल्याने अखेर शिवसेनेला कोर्टाची पायरी चढावी लागली आहे. (Shinde Fadnavis Govt – Shivsena Uddhav Thackeray)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थावर होणार का, याबाबत संभ्रम निर्माण करण्यात शिंदे-फडणवीस सरकार यशस्वी झाले आहे. तर दुसरीकडे दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. यामुळे अखेर शिवसेनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या या याचिकेवर हायकोर्टात उद्या सुनावणी होणार आहे.
दादरमधील शिवाजी पार्क येथे होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा ही शिवसैनिकांसाठी पर्वणी असते.
या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक येत असतात.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली ही परंपरा सध्या उद्धव ठाकरे चालवत आहेत. परंतु शिंदे गटाने दसरा मेळाव्यावर सुद्धा हक्का सांगत शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दावेदारी केली आहे. शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी सर्वप्रथम अर्ज दाखल करूनही शिवाजी पार्कच्या परवानगीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शिवसेनेला परवानगी देण्यास रखडवले आहे.
सर्वात आधी अर्ज दाखल करूनही दसरा मेळाव्यासाठी महानगरपालिकेने परवानगी न दिल्याने शिवसेना आक्रमक
झाली आहे. यामुळे आता शिवसेनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.
बीएमसी जी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांविरोधात शिवसेना कोर्टात गेली आहे.
या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा
शिवतीर्थावरच होणार असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Shinde Fadnavis Govt – Shivsena Uddhav Thackeray | The move of Shinde-Fadnavis government and the behavior of the municipal administration, finally the big decision of Shiv Sena for Dussehra gathering on Shivtirtha
हे देखील वाचा :