बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिनं 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त एक ट्विट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. परंतु एका चुकीमुळं ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. परंतु जेव्हा तिला ट्रोल केलं गेलं तेव्हा तिला चुकीची जाणीव झाली आणि नंतर तिनं तिचं ट्विट डिलीट केलं.
शिप्लानं प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा देत ट्विट केलं. परंतु तिनं स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ज्यामुळं ती ट्रोल झाली. तिचं ट्विट समोर आल्यानंतर अनेकांनी तिला सांगितलं की, आज स्वातंत्र्य दिन नाही, तर प्रजासत्ताक दिन आहे. आपली चूक लक्षात आल्यानंतर तिनं लगेच आपलं ट्विट डिलीट केलं आणि चाहत्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
— TimePass (@TimePassTalks) January 27, 2021
शिल्पानं जरी तिचं ट्विट डिलीट केल असलं तरी अनेकांनी तिच्या ट्विटचे स्क्रीनशॉट घेतले आहेत. अनेकांनी हे स्क्रीनशॉट शेअर करत तिला ट्रोल केलं. तिच्या ट्विटचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/TheShilpaShetty/status/1353947337547079680?s=20
शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती निकम्मा आणि हंगामा 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमांमधून शिल्पा पुन्हा वापसी करणार आहे. हंगामा 2 मध्ये शिल्पा परेश रावल आणि मीजान जाफरी तर निकम्मामध्ये ती अभिमन्यु दसानी आणि शर्लिन सेठीयासोबत दिसणार आहे.