बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिटनेस आणि हेल्दी लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. तिचे योगाचे व्हिडिओ, वर्कआऊट टिप्स ती नेहमी सोशल मीडियावर शेयर करत असते. नुकताच शिल्पा शेट्टीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यामध्ये तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना निरोगी ठेवण्याचे आणि त्यांची इम्यूनिटी कायम राखण्याचे सीक्रेट उघड केले आहे.
बदलत्या हवामानातील आजारांपासून वाचवेल हे हर्बल ड्रिंक
शिल्पाने या व्हिडिओमध्ये गोल्डन पोशन नावाने एक रेसिपी शेयर केली आहे. जी आजारांशी लढणारी इम्यूनिटी मजबूत करण्यासह पचनशक्ती मजबूत करते. या पोस्टमध्ये शिल्पाने म्हटले आहे, सध्याच्या स्थितीत हवामान सतत बदलत आहे आणि महामारीची स्थिती आहे. यासाठी लोकांना आपल्या आरोग्याची चिंता आहे. अशावेळी तुम्ही इम्यून सिस्टम आणि पचनशक्ती मजबूत बनवण्यासाठी रोज गोल्डन पोशनचे सेवन करा.
हळद, लिंबू, आले आणि मधाची कमाल
या गोल्डेन पोशनमध्ये गरम पाण्यासह, लिंबू रस, ताज्या आल्याचा रस, अंबे हळद, मध, दालचिनी आणि चिमुटभर मीठाचा वापर केला जातो. या सर्व वस्तू नैसर्गिक असल्याने कोणताही साइड इफेक्टसुद्धा नाही.
– अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी असलेली अंबे हळद अपचन आणि खोकला दूर करते.
– व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असलेले लिंबू शरीर डिटॉक्ट करून इम्यून सिस्टम मजबूत करते.
– आल्यामुळे पचनशक्ती वाढवते. मेटाबॉलिज्म मजबूत होते. शरीर डिटॉक्स होते.
– मधातील अँटीबॅक्टेरियल गुण पचनशक्ती आणि इम्यूनिटी मजबूत करतात.