मुंबई : बहुजननामा ऑनलाईन : सातारा जिल्ह्यातील माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांच्या बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या नावावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सहमती दर्शवली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद हे दुसऱ्या कोणाला तरी द्यावे अशी मागणी करण्यात आली.भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांनी याच्या अगोदर पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पहिले आहे. भास्कर जाधव हे शिवसेनेत गेले असून आणि जितेंद्र आव्हाड याना मंत्रिपद मिळणार आहे.
धनंजय मुंढे यांना प्रदेशाध्यक्ष करावे असं काही जणांचं मत होतं. पण आता धनंजय मुंढे यांचासुद्धा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यामुळे शरद पवार यांचे विश्वासू शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार आहे.शशिकांत शिंदे यांना अगदी थोड्या मतांसाठी विधानसभा गमवावी लागली होती.
Visit : bahujannama.com