नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असणारे माजी परराष्ट्र तसेच कॉंग्रेस नेते आणि विख्यात लेखक शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे..काही दिवसापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी यांच्याविरोधात भाजपा नेते राजीव बब्बर यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी शशी थरूर यांनी आज दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
या संदर्भांत, शशी थरूर हे बंगळुरू लिट फेस्टमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना पुस्तकातील काही पाने उपस्थितांना वाचून दाखवली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी हे पिंडीवरचे असे विंचू आहेत की, ज्याला तुम्ही आपल्या हाताने काढू शकत नाही किंवा चपलेने मारूही शकत नाही असे विधान केले होते. यावर भाजपा नेते राजीव बब्बर यांनी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करताना आपल्या भावना दुखावल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्याविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली होती.शशी थरूर यांच्या विधानानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता. दिल्लीमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्याच वेळी न्यायालयाने शशी थरूर यांना जामीन मंजूर केला. याप्रकरणी आतापुढील सुनावणी २५ जुलै रोजी होणार आहे.
Delhi: Shashi Tharoor appeared before Rouse avenue court in "scorpion sitting on a shivling" remark case. Court grants bail to Tharoor on personal bond of Rs 20,000. Matter will now be heard on July 25 for recording of statement of complainant&BJP leader Rajeev Babbar (file pic) pic.twitter.com/byHZvZU5tO
— ANI (@ANI) June 7, 2019