मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज (बुधवार) मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार (Sharad Pawar) यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप (BJP) नेत्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र, पत्रकार परिषद सुरु करण्यापूर्वी त्यांनी एक ‘गूड न्यूज’ (Good News) सर्वांना देत पत्रकार परिषदेची (Press conference) सुरुवात काहीशी हटके केली.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे शरद पवार यांच्या शेजारी बसले होते. त्यांच्याकडे पाहत एक आनंदाची बातमी शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितली. जयंतरावांच्या मुलाने पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर (Eiffel Tower in Paris) जाऊन एका मुलीला प्रपोज (propose) केल्याची वर्ता त्यांनी सांगितली. थेट पॅरिसमध्ये जाऊन प्रपोज केल्याचे सांगत आमची पोरं काय करतील याचा नेम नाही, असे पवार म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
Join our Whatsapp Group, Telegram,
and facebook page for every update
पवार पुढे म्हणाले, बघा आमचा सर्वांचा दृष्टीकोन किती व्यापक झाला आहे. जयंतरावांच्या चिरंजीवांनी मंगळवारी संध्याकाळी पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केले. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळाली. आम्ही आता वाळवा किंवा इस्लामपूरपर्यंत (Islampur) सीमित नाही तर आम्ही पॅरिस वगैरे ठिकाणी जातो. ठिकाण इंटरनॅशनल (International) असले तरी पण मुली डोमेस्टिक (Domestic) आहे. त्यामुळे त्यांचे लग्न इथेच होईल. आमची मुले कुठे जाऊन काय करतील हे सांगता येत नाही, असेही शरद पवार म्हणाले.
Web Title : Sharad Pawar | Sharad Pawar says story of Jayant Patil’s son
Pune Corporation | पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी मिळणार? महापालिका प्रशासन म्हणते…
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 121 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी
Pune-Mumbai Sinhagad Express | सिंहगड एक्सप्रेस सोमवार पासून धावणार, 19 महिने होती बंद
PM Gati Shakti | ‘गतीशक्ती’ योजनेतून कसे होईल शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट, जाणून घ्या सर्वकाही
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 129 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी
Sharad Pawar | मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांचा जोरदार पलटवार