नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीची देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या बैठकी संदर्भात अनेक अफवांना ऊत आला होता. मात्र शरद पवारांनी एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत या बैठकी संदर्भात स्पष्ट केलं आहे. त्यानंतर मुलाखतीविषयी आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माहिती दिली आहे. ‘माझ्या वडिलांनी पंतप्रधान मोदींना विनम्रपण नकार दिला, ‘असं सुप्रिया सुळेंनी एक मुलाखतीत सांगितल.
शरद पवार काय म्हणाले ?
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेविषयी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली होती. पण, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली. त्यावर काल पवारांनीच मुलाखतीमध्ये स्पष्ट संगितलं. ‘पंतप्रधान मोदींनी मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल, तसेच सुप्रिया सुळे यांच्यासारख्या नेत्या केंद्रात चांगली जबादारी घेऊ शकतात.’ अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी दिल्याचं शरद पवार यांनी सांगितलं होतं.
सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं चित्र
एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी म्हटल की, त्यांच्या बैठकीला मी उपस्थित नव्हते. ती बैठक दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये होती. पंतप्रधान मोदींचे ते औदार्य होतं की, त्यांनी असा प्रस्ताव दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ऑफर दिली, तीला माझ्या वडिलांनी अतिशय नम्रपणे नकार दिला होता. मुळात महाराष्ट्रातील राजकारण वेगळं असून इथे व्यक्तिगत संबंधांना खूप महत्त्व आहे. जरी वैचारिक मतभेद असले तरी, संबंध खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही पवारसाहेबांना ऐकलं असेल की त्यांनी काय सांगितलं. त्यांनी अतिशय नम्रपणे नकार दिला.शरद पवार हे केवळ माझे वडीलच नाही तर, बॉसही आहेत. तुम्हाला माहितीच आहे की, बॉस इज ऑलवेज् राईट असतात.
Visit : bahujannama.com