पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Sharad Pawar On Modi Government | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ED, CBI छाप्यावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर तोफ (Sharad Pawar On Modi Government) डागली आहे. सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकार ईडी, सीबीआय, नार्कोटिक (NCB), प्राप्तिकर (Income Tax) या सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. कितीही छापे मारा, पण महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Govt.) पडणार नाही. पाच वर्षे हेच सरकार राहणार असून या पुढेही जनतेचा विश्वास जिंकून पुन्हा हेच सरकार येईल, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शरद पवार म्हणाले, देशातील ज्या राज्यांमध्ये भाजप सरकार नाही तेथील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. भाजपचे एका माजी खासदार, एक माजी मुख्यमंत्री बोलले की, यंत्रणेकडून लगेच कारवाई होते? यावरूनच जनतेने काय आहे ते समजून घ्यावे? खासदार भावना गवळी (Shivsena MP Bhavna Gavli) , शिवसेना नेते अनिल परब (Shivsena Leader Anil Parab), राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (NCP Minister Nawad Malik) यांच्या विराेधात सरकारी तपास यंत्रणांचा गैरवापर केला आहे. पक्ष सोडला म्हणून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. ही बाब चुकीची आहे. पंच म्हणून गुन्हेगारीच्या व्यक्तींना घेऊन चांगल्या माणसांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करून त्यांना अडकवण्याचे काम सुरु आहे हे योग्य आहे का? असा सवालही त्यांनी केला.
आरोप करणारे पोलीस आयुक्त बेपत्ता
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर आरोप करणारे पोलीस आयुक्त गायब आहेत. आरोप केल्यानंतर त्यांनी तत्काळ राजीनामा दिला. मात्र, त्या पोलीस आयुक्तांवर गुन्हे दाखल होत आहेत. ते कुठे आहेत कोणालाही माहित नाही. त्यांना शोधण्यात तपास यंत्रणा पुढाकार घेत नसल्याचाही आरोप पवार यांनी यावेळी केला. मी पुन्हा येणार… असे सांगणारे काही परत आले नाही त्यामुळे सूडबुद्धीने महाविकास आघाडीचे मंत्री, नेते यांच्या चौकशी सुरु आहेत. सत्ता नसल्यानेच त्यांची आणि त्यांच्या पक्षाची अस्वस्थता वाढली आहे. त्यातूनच काहीही टिप्पणी करत असून हे दुसर तिसरं काही नाही तर सत्ता नसल्याचं हे दुःख असल्याचा टोलाही पवार यांनी (Sharad Pawar On Modi Government) लगावला.
प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Raids) छाप्यावरूनही पवार यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, प्राप्तिकर विभागाने अजित पवार यांच्या भगिनींच्या घरावर छापे टाकले. हा विषय न्यायालयात आहे. पण त्यात काही निष्पन्न होणार नाही. १५ ते २० लोक छापे मारतात. काम संपल्या नंतरही त्यांना तिथेच थांबवले जाते. चौकशी झाल्यानंतर पाहुणे जाणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. पाहुणा जेव्हा जात नाही तेव्हा त्यांची हकालपट्टी करावी लागते. मात्र, पाहुण्याची काही चुकी नव्हती. कारण वरूनच त्यांना तसे आदेश होते.’
उद्धव यांनी मुख्यमंत्री व्हावे, हा माझा आग्रह
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु होत्या. पण नेतृत्व कोणी करायचे असा प्रश्न होता. दोन-तीन नावे होती. ज्यावेळी तीन पक्षांच्या आमदारांची बैठक झाली त्यावेळी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) माझ्या शेजारी बसले होते. त्यांचा हात मी स्वत: वर केला व हे आपल्या सरकारचे नेतृत्व करतील, असे जाहीर केले असे सांगत पवार म्हणाले, माझा आग्रह होता की, शिवसेनाप्रमुखांच्या चिरंजीवाने मुख्यमंत्री व्हावे. त्यामुळेच मी सक्तीने त्यांचा हात वर केला. वस्तुस्थिती पाहता फडणवीसांनी अनाठायी आरोप करणे योग्य वाटत नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
Web Title : sharad pawar on modi government centre misusing probe agencies destabilise non bjp governments says ncp leader sharad pawar
- Anti Corruption Bureau Pune | पुण्यातील लाचखोर उपायुक्त नितीन ढगेच्या घरात सापडले 2.81 कोटींचं ‘घबाड’; ‘बेनामी’चा होणार पर्दाफाश
- Masked Aadhaar Card |काय आहे Masked Aadhaar Card, काय आहेत याचे फायदे आणि कसे होते तयार, जाणून घ्या सविस्तर
- Devendra Fadnavis | नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर का पडावं लागलं? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न