मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari | भगतसिंग कोश्यारी यांना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी निकालात काढावे, अशा व्यक्तीला राज्यपाल पदासारख्या जवाबदाऱ्या देऊ नयेत. अशी परखड शब्दांत टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. (Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari)
भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांना जुने आदर्श म्हणत बाबासाहेब आंबेडकर किंवा नितीन गडकरींसारख्या नवीन व्यक्तींचा आदर्श घ्यायला हवा, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण भलतेच तापले होते. भाजप सोडता समाजातील सर्व स्तराकडून त्यांनी केलेल्या वक्तव्याची टीका झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांविरोधात वक्तव्य केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानाबद्दल शरद पवारांनी कठोर शब्दात टीका केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुंबईत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, ‘राज्यपाल ही एक संस्था आहे.
त्या पदाबरोबर काही मर्यादा आणि बंधने येत असतात.
पण महाराष्ट्राच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाने त्या मर्यादा ओलांडल्या आहेत.
जरी त्यांनी त्यांच्या त्या विधानानंतर महाराजांबद्दल चांगले बोलणारे विधान केले असले,
तरी ते उशिरा आलेले शहाणपण आहे. त्यामुळे या राज्यपालांचा विषय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी निकाली काढावा.
अशा व्यक्तीने राज्यपालासारख्या पदावर असू नये.’ असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले आहे.
Web Title :- Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari | ncp chief sharad pawar slams governor bhagat singh koshyari for comment on chhatrapati shivaji maharaj
हे देखील वाचा :
Pankaj Tripathi | ‘या’ कारणामुळे पंकज त्रिपाठी यांनी नाकारल्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर