Sharad Pawar News | नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शरद पवार मोठा निर्णय घेणार? सर्व स्तरावरील पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक

December 26, 2024

मुंबई: Sharad Pawar News | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठे यश मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अवघ्या १० जागा निवडून आल्या. त्यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचा विचार करता शरद पवार पक्षबांधणीच्या तयारीला लागलेले दिसत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ८ आणि ९ जानेवारीला मुंबईमध्ये जम्बो बैठक पार पडणार आहे. ही बैठक वाय बी चव्हाण सेंटर येथे आयोजित केली गेली आहे. शरद पवार पक्षामधील जी महत्त्वाची पदे आहेत तिथे कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद जयंत पाटील यांच्याकडे आहे. याआधी अनेकदा जयंत पाटील यांचे पद जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होती. मुख्य प्रदेशाध्यक्षपदासोबत महिला प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष आणि विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपद बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे.

८ जानेवारीला होणाऱ्या बैठकीला महाराष्ट्रातील सेल्स प्रमुखांना बोलावले आहे. तर दुसऱ्या दिवशी पक्षाचे आजी-माजी खासदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये स्वत: शरद पवार उपस्थित राहणार असून ते चाचपणी करून मोठा निर्णय घेणार आहेत. दरम्यान जयंत पाटील यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार? याबाबत उत्सुकता आहे.