Sharad Pawar News | शरद पवार यांचा भाजपावर निशाणा; म्हणाले – ‘संविधान बदलाची भूमिका मतदारांमुळं पूर्ण झाली नाही’

छ. संभाजीनगर: Sharad Pawar News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर प्रचाराला जोर आला आहे. राज्यभरात नेत्यांच्या बैठकी, सभा, रॅली, पदयात्रा सुरु आहेत. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे. दरम्यान गंगापूर येथील जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींचे घटना बदलण्याचे मनसुबे लोकसभेत कमी जागा देवून तुम्ही पूर्ण होवू दिले नाही”, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.
शरद पवार म्हणाले, ” लोकसभा निवडणुका नुकत्याच झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४०० जागा निवडून आणू असा दावा केला होता. मत मागण्यासाठी ते लोकांकडे गेले. घटनेत बदल करण्याचा डाव मोदी आणि सहकाऱ्यांचा होता. मात्र, तुमचं अभिनंदन की, तुम्ही त्यांचा पराभव केला.
मागच्या लोकसभेला महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कमी खासदार मिळाले. मात्र यावेळी चित्र बदललं. त्यामुळं त्यांना चारशे जागा मिळाल्या नाही म्हणून घटनेत बदल झाला नाही. विधानसभेत देखील अशाच पद्धतीनं भाजपा विरोधी मतदान करावं लागेल,” असं आवाहन शरद पवार यांनी केले.
Comments are closed.