Sharad Pawar NCP On PM Modi-Amit Shah | ‘मोदी-शहांमुळेच 4 चे 8 खासदार निवडून आले’, राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – ‘ईडी सांभाळणाऱ्यांना माणसे सांभाळता आले नाही’

श्रीगोंदा: Sharad Pawar NCP On PM Modi-Amit Shah | राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने राज्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा (Shivswaraj Yatra) काढण्यात आली आहे. ही यात्रा श्रीगोंदा येथे आल्यावर माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांसह (Ajit Pawar NCP) महायुतीवर (Mahayuti) निशाणा साधला.

जयंत पाटील म्हणाले, ” सर्व नेते एकत्र असताना मागील लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४ खासदार राज्यात निवडून आले होते मात्र सर्वजण सोडून गेले आणि आता आमचे ८ खासदार निवडून आले आहेत. याचे श्रेय आम्ही मोदी आणि शहा यांना देतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भाजप नेते देशात व राज्यात काय तोऱ्यामध्ये वागत होते हे सर्वांनी पाहिले.

मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांच्या बूथ कमिट्या कोठे वाहून गेल्या हे देखील समजले नाही. याचे कारण ईडी सारख्या संस्था सांभाळणाऱ्यांना माणसे सांभाळता आले नाही. आणि शरद पवार यांनी मात्र आजपर्यंत माणसे जपली त्यामुळे हे यश मिळाले.”

यावेळी त्यांनी राज्यामध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर ताशेरे ओढले तसेच सध्या रिझर्व बँकेकडून आठ लाख कोटी रुपयांचे यापूर्वीच कर्ज घेतलेले असताना पुन्हा आणखी नवीन कर्जाची मागणी या सरकारने केली आहे याचा अर्थ आम्ही सत्तेवरून तर जाणार आहोत परंतु जाताना राज्याची वाट लावून जाणार असे ठरवले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.