Sharad Pawar NCP | शरद पवारांचा नवा डाव! पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता भाजप सोडण्याच्या तयारीत; म्हणाले – “सोलापूरसाठी कुठलीही तडजोड करण्याची माझी तयारी”
सोलापूर: Sharad Pawar NCP | माढा विधानसभा मतदारसंघातून (Madha Assembly Constituency) निवडणूक लढवण्याबाबत रणजितसिंह (Ranjit Singh Mohite Patil) चाचपणी करत असल्याची माहिती आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी (Solapur District) कुठलीही तडजोड करण्याची माझी तयारी आहे, अशा शब्दात रणजितसिंह मोहिते पाटलांनी पक्षांतराचे संकेत दिले आहेत. दरम्यान रणजितसिंह मोहिते एकतर काँग्रेसमध्ये (Congress) किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर २०२० मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर सोलापूर येथून विजयी झाले.
अकलूज (Akluj) मध्ये कालच काँग्रेसची सभा झाली. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शक्तीप्रदर्शन केले. या सभेनंतर अजित पवार (Ajit Pawar NCP) यांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन शिंदे (MLA Baban Shinde) हे शरद पवार यांच्या भेटीला आले होते. ते माढ्यातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्याठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटील देखील इच्छुक आहेत. काँग्रेस की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस याची चाचपणी सध्या ते करीत आहेत.
माढा विधानसभा जिंकणे हे २००४ पासून मोहिते पाटील गटाचे स्वप्न होते. आता यावेळी माढा विधानसभेतून रणजीत सिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास विद्यमान अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत. याचेच गणित शरद पवार सध्या मांडत असून त्यामुळेच काल झालेल्या कार्यक्रमात रणजीत सिंह मोहिते पाटील हे उघडपणे स्टेजवर आले आणि त्यांनी भाषणही केले.
सध्या माढा विधानसभेसाठी इच्छुकांची मांदियाळी लागली असून हे बहुतांश इच्छुक उमेदवार अकलूजच्या कार्यक्रमाला हजर होते. या सर्वांसमोर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेले तडजोडीचे संकेत हे राष्ट्रवादी गटात प्रवेशाची नांदी असून तसे झाल्यास भाजपाला मोहिते पाटील घरातील उरलेल्या एकमेव सदस्याचा पाठिंबाही गमवावा लागणार आहे.
Comments are closed.