बहुजननामा ऑनलाईन टीम – मोकाटे यांनी कोथरूड मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी चांगलीच तयारी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी मोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांचा पाठिंबा घेण्याच्या प्रयत्नात आहेत . परंतु सध्या मात्र मोकाटे यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे.
मोकाटे यांच्या वेट अँड वॉच मागील कारणही तसेच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता कोथरूड मतदारसंघात स्वतः शरद पवार हे लक्ष देत आहेत. तर दुसरीकडे अद्यापही मोकाटे यांच्या भूमिकेला शरद पवार आणि राज ठाकरे यांनी सहमती दर्शवली नाही. जो पर्यंत पवार आणि ठाकरे यांच्याकडून सहमती येत नाही तोपर्यंत मोकाटे हे चंद्रकांत पाटलांविरुद्ध लढणार की नाही याचा निर्णय गुलदस्त्यातच राहणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार स्वतः कोथरूड मतदार संघात लक्ष देऊन आहेत. अद्यापतरी त्यांनी कोणत्याही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. किंवा अपक्ष म्हणून मोकाटे यांना पाठिंबा देणार हे देखील त्यांनी जाहीर केलेले नाही. याबाबत सध्या राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा सुरु आहे.
Visit : bahujannama.com