• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक, रिमोट कंट्रोल नव्हे !

by Sikandar Shaikh
November 27, 2020
in ताज्या बातम्या
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey Interview with Sanjay Raut) यांची परखड मुलाखत वाचकांच्या भेटीला आली आहे. तत्पूर्वी या मुलाखतीचे प्रोमो खासदार राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरुन पोस्ट केले होते. सामना वर्तमानपत्रात या मुलाखतीचे तिन्ही भाग प्रसारीत केले आहेत. त्यात मुख्यमंत्र्यांनी भाजपाला अनेक मुद्यांवर इशारा देत चांगलाच दम भरला आहे. तसेच राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी जनता हेच या सरकारचा केंद्रबिंदू असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे. शेती उद्योगासह राजकारणावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीचे भवितव्य चांगले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांना लवकरच दिल्लीत जाऊन भेटणार आहे. तर, शरद पवार हे सरकारचे मार्दर्शक आहेत, रिमोट कंट्रोल (sharad-pawar-guide-government-not-remote-control) नाहीत, असा खुलासाही उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या तिसऱ्या भागात केल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनी मुलाखतीच्या याच तिस-या भागात सीएए कायद्याचे समर्थन केले आहे. मात्र एनआरसीचा फटका देशातील हिंदूंना बसेल, आदिवीसी नागरिकांनी कुठून आपले नागरिकत्व सिद्ध करावे, कुठून त्यांनी दाखले आणावेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. कोणतेही सरकार घटनेनुसारच चालते. मोदी घटनाबाह्य सरकार चालवत आहेत काय? अन्न, वस्त्र, निवारा हेच आमचे संविधान, असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुलाखतीत खा. राऊतांनी या सरकारला बाप किती? असा प्रश्न मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बाप हा एकच असतो आणि आईही एकच असते, असे म्हणत रिमोट कंट्रोल वगैरे काही नाही. आम्ही तीन वेगळे पक्ष आहोत. मी माझ्या पक्षाचा प्रमुख आहे, आणि हो तुम्हाला शरद पवारांविषयी विचारयचे आहे का. तर, शरद पवार हेही रिमोट कंट्रोल म्हणून वागत नाहीत. त्यांच्या काही सूचना असतील, तर त्या जरुर करतात. त्यांचा अनुभव दांडगा आहे, त्यांच्या अनुभवाने ते मला नक्कीच मार्गदर्शन करतात. मला एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी मीही त्यांचे मार्गदर्शन घेतो. पण, त्यांचीही एक खास गोष्ट आहे, त्यांना एखादी गोष्ट समजावून सांगितल्यानंतर तेही म्हणतात, ठीक आहे… तुमचे म्हणण बरोबर आहे., असे अनुभव सांगत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना मार्गदर्शक मंडळात स्थान दिले आहे.

शेतकरी, कष्टकरी हाच केंद्रबिंदू
शेतकरी आणि कष्टकरी हेच विकासाचे केंद्रबिंदू राहतील. हे आपल सरकार त्यांच्या हितासाठीच राबवले जाईल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील एकही उद्योग आता राज्याच्या बाहेर जाणार नाही, रोजगाराच्या संधी वाढतील. एमआयडीसींची अवस्था चांगली नाही, त्यात सुधारणा होईल हा शब्द उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून दिला. तसेच, नाईट लाईफ म्हणजे फक्त मौजमजा छंद फंद नाहीत, श्रमणाऱ्या मुंबईची ती गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.

मुंबईतील काही पुनर्विकासाचे प्रकल्प रखडले आहेत. त्यात बरीच गुंतागुंत आहे. ती गुंतागुंत सोडवावी लागेल आणि त्याच्यात गुंतवणूक आणावी लागेल ्से म्हणत या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले आहे. सरकार 5 वर्षे पूर्ण करणारच सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांनी अकरा दिवसांत सरकार पडणार असे भाकित अनेकांनी केली होती, यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर, उत्तर देताना तस बोलणाऱ्यांचे दात पडत आलेत, आता हे सरकार नक्कीच 5 वर्षे पूर्ण करणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच, सामनाच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग नमस्कार घालतो, सर्वांच्या सहकार्यामुळेच, एकजुटीमुळेच हे शक्य झाले आहे. ‘

मी संयमी आहे, पण याचा अर्थ नामर्द नाही
ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची नाही. मी शांत आहे, संयमी आहे, पण याचा अर्थ मी नामर्द नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपाला इशारा दिला आहे.

तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढूः मुख्यमंत्री
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला, त्यावेळी त्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे ठणकावले आहेत. तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात, तेव्हा अशी वेसण घालावीच लागेल. ईडी काय, सीबीआय काय, त्यावर राज्याचा अधिकार नाही? असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. आम्ही देतो ना नाव, आमच्याकडे आहेत नाव. मालमसाला तयार आहे, पूर्ण तयार आहे. पण सुडाने जायच का?. मग जनतेन आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची सुडानेच वागायच असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असा दमच उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना भरला आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी पोस्ट केलेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये राऊत यांनी राज्यात वाढीव वीजबिलावरून सुरु असलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. यावर उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे मुलाखतीत पाहण महत्त्वाचे ठरणार आहे. मागील काही दिवसापासून राज्यात वीजबिलावरून रणकंदन माजल आहे. भाजपाने वीजबिल होळी आंदोलन केले तर राज ठाकरेंच्या मनसेने वीजबिलाच्या मुद्द्यावर राज्यभरात प्रचंड मोठे मोर्चे काढले त्यामुळे वीजिबिलाच्या या घटनेवर उद्धव ठाकरे काय सांगतात आणि भाजपा-मनसेवर काय भाष्य करतात याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: bahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathibreaking newsCM Thackeraycm uddhav thackerayCM Uddhav Thackrey Interview with Sanjay Rautcurrent newslatest news todaylatest news today in marathiMaha Vikas Aghadi Sarkarmaharashtra marathi newsmaharashtra newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaMP RautmumbaiNews in MarathipoliticsPrime Minister Narendra ModiSanjay RautShiv Senasonia gandhitodays latest newstodays marathi newstop news bahujannamaखासदार राऊतपंतप्रधान नरेंद्र मोदीबहुजननामामहाविकास आघाडी सरकारमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुख्यमंत्री ठाकरेराजकारणशिवसेनासंजय राऊतसोनिया गांधी
Previous Post

7th Pay Commission : लाखो केंद्रीय कर्मचार्‍यांना मोठा दिलासा ! आता PF संबंधी प्रकरणात मिळेल ‘ही’ नवीन सुविधा

Next Post

WhatsApp मॅसेजमध्ये आलेल्या ‘या’ लिंकवर चुकूनही करू नका क्लिक, सरकारने दिला इशारा

Next Post
whats

WhatsApp मॅसेजमध्ये आलेल्या 'या' लिंकवर चुकूनही करू नका क्लिक, सरकारने दिला इशारा

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकीय

शरद पवार हे सरकारचे मार्गदर्शक, रिमोट कंट्रोल नव्हे !

November 27, 2020
0

...

Read more

आठवड्यातच हिसकावला गेला एलन मस्कचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा मुकुट, पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर

5 days ago

Kolhapur News : त्यांनी सीमकार्ड बाहेर बाकावर ठेवलं अन् जेलमध्ये पोहचले, तुरूंगरक्षक सहभागी असण्याची शक्यता

2 days ago

Kolhapur News : जिल्हा बँकेची डोकेदुखी ठरते ‘आजरा’ची साखर

4 days ago

Video : आजही जनता दरबारास धनंजय मुंडेंची उपस्थिती, सोडविले नागरिकांचे प्रश्न अन् दिल्या कार्यकर्त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा

3 days ago

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

19 hours ago

बाबरी मशिद केस : उमा भारती, जोशी, आडवाणींसह 32 जणांना निर्दोष सोडण्याच्या विरोधात सुनावणी आज

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat