सांगली : बहुजननामा ऑनलाईन – पुढच्या 5 वर्षांमध्ये राज्याला रोहितच्या रुपाने आबा पाहायला मिळतील असं भावूक वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. तासगावमध्ये माजी मुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “माझ्यापेक्षा आबा 20 वर्षांनी लहान होते. हे त्यांच्या जाण्याचे वय नव्हते. त्यांचे कर्तृत्व बहरण्याचा कालावधी होता. आबांच्या जाण्याचे दु:ख अंत:करणात कायम राहिल. पुढच्या पिढीला संपूर्ण राज्याला रोहितच्या रुपाने आबा पहायला मिळतील. आबांच्या कुटुंबाला इथुन पुढे असे प्रेम राहू द्या. या प्रेमातून राज्याला कर्तृत्ववान नवी पिढी पहायला मिळणार.”
पुढे बोलताना पवार म्हणाले की, “आर आर आबा या हिमालयाच्या उंचीच्या माणसाचं कर्तृत्व न मोजता येणारं आहे. आबा आणि सामान्य माणसाचं वेगळं नातं होतं. त्यांनी स्वच्छ चारित्र्याचा आदर्श निर्माण करून काम केले. त्यांची ग्रामीण भागाशी नाळ होती. ग्रामविकास मंत्री पदाच्या माध्यमातून झालेल्या अनेक कामांची दखल देशपातळीवर घेतली गेली.”
पवार म्हणाले की, “राज्यात काही जिल्हे नक्षलवादाने ग्रासलेले असताना आबांनी गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे पालकत्व पालकमंत्री म्हणून मागून घेतले. नक्षलवादी भागात मोटारसायकलवरून जाणारे राज्यातील पहिले मंत्री आबा होते. आजही आदिवासी बांधव आबांचे नाव घेतात.”
यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “आबांचं स्थान महाराष्ट्रव्यापी होतं. आबांची उणीव राज्यात जाणवतेच. त्याहीपेक्षा राष्ट्रवादीला जाणवते. आबा असते तर आजचं चित्र वेगळं असलं असतं. 2024 मध्ये या तासगाव मतदारसंघासाठी रोहितला पक्ष तिकीट देईल एवढी रोहितची मजल आहे.” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
- १४ दिवसांत कमी होऊ शकते ७ किलो वजन, हा ‘डाएट प्लॅन’ करा फॉलो
- थर्मामीटरने घरीच करा ‘थायरॉइड टेस्ट’, जाणून घ्या पद्धत
- ‘हे’ माहित आहे का ? लसणाची सालसुद्धा आहे औषधी, हे आहेत ५ फायदे
- फक्त ५ रुपयांचे ‘हे’ ज्यूस, दूर करेल ७ आरोग्य समस्या, जाणून घ्या कसे बनवावे
- ३० वयानंतर पुरूषांमध्ये होतात ‘हे’ बदल, करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या
- चुकूनही खाऊ नका ‘गरम’ केलेला ‘मध’, अन्यथा होतील ‘हे’ दुष्पपरिणाम
- नेहमी तरुण आणि निरोगी ठेवणारे आयुर्वेदिक साधेसोपे उपाय, जाणून घ्या
प्लास्टिक वापरताय? ‘हे’ लक्षात ठेवा, होऊ शकतात कँसरसारखे गंभीर आजार - गरोदर होताच महिलांच्या शरीरात होतात ‘हे’ ५ बदल, तुम्हाला माहिती आहे का?
- नाभीवर ‘या’ ४ गोष्टी लावल्याने चेहऱ्यावर पडतो असा प्रभाव, जाणून घ्या उपाय
- ‘ब्लड ग्रुप’नूसार असा बदला आहार, झटपट कमी होईल वजन, जाणून घ्या
- वारंवार ‘डोकेदुखी’ होण्याची ५ कारणे, जाणून घ्या त्यावरील उपाय
- पौरुषत्व आणि वीर्य वृद्धीसाठी रामबाण आहेत ‘हे’ ५ आयुर्वेदिक उपाय
- रात्री चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ, होईल एवढे नुकसान, जाणून घ्या
- भूक लागत नसेल तर करा ‘हे’ ८ सोपे उपाय, त्वरित दुर होईल समस्या