मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज 80 वा वाढदिवस राज्यात विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे. शरद पवार यांना देशातील नेते वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. साताऱ्याचे भाजपचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी देखील शरद पवार यांना फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो शेअर (Photo Share) केला आहे.
उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेला फोटो फेसबुक पेजवर अपलोड करून शरद पवारांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. आदरणीय शरद पवार यांना 80 व्या जन्मदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा, आपणास दीर्घायुष्य लाभो, अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घायुषी व्हा, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
"Best wishes to Sharad Pawar ji on his birthday. May Almighty bless with good health and a long life," Prime Minister Narendra Modi tweets.
(File photos) pic.twitter.com/12APpHSaQH
— ANI (@ANI) December 12, 2020
तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहे. महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय श्री शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना.
महाविकास आघाडीचे आधारस्तंभ, आदरणीय श्री. @PawarSpeaks साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना. pic.twitter.com/5B8Sfts46e
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 12, 2020