सांगोला/सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरीनंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) सतत आपल्या विधानांमुळे चर्चेत राहतात. आता परत एकदा राष्ट्रवादीवर (NCP) टीका केली आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) एकदा महाराष्ट्राचा दौरा केला की राष्ट्रवादी सत्तेत येते, असा दवा खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केला होता. मात्र, शरद पवार कुठेही फिरले तरी त्यांचा आकडा 50 आमदारांच्या वर जात नाही. एवढ्यातच त्यांचा खेळ सुरु झाला आहे, असा टोला शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांनी लगावला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी पुण्यात माध्यमांनी विचारले की, दसरा मेळाव्याला (Dasara Melava 2022) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं भाषण एकाच वेळी सुरु झालं तर कुणाचं भाषण ऐकणार? असा प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी सांगितले, एकाच वेळी दोन्ही भाषण् सुरु झाली तर आधी उद्धव ठाकरेंचं ऐकेन आणि नंतर एकनाथ शिंदेंचं ऐकेन. अर्ध्या तासाने काही फरक पडणार नाही असे उत्तर दिले. यावर शहाजीबापू पाटील (Shahjibapu Patil) यांनी सांगोल्यात बोलताना अजित पवारांना खोचक टोला लगावला.
शहाजीबापू म्हणाले, अजित पवारांना आता ही दसऱ्याची भाषणं ऐकणं, इंदुरीकर महाराजांची कीर्तन
(Indurikar Maharaj Kirtan) ऐकणे हेच काम राहिलंय.
भाषण ऐकण्याशिवाय त्यांना दुसरं काही काम उरलं नाही. ते विरोधी पक्षनेते झाले आहेत.
पण ते कसं करायचं असतं ते त्यांना अजून कळत नाही. कारण अजित पवार कायम सत्तेवर राहिले आहेत.
ते अजित पवारांना समजलं, पण हे अजून समजेना, असं शहाजीबापू म्हणाले.
प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी अजित पवार आणि भाजप (BJP) पुन्हा एकत्र येतील का?
असा प्रश्न विचारल्यावर शहाजीबापू यांनी मिश्किल टिप्पणी केली.
हा मुद्दा काही माझ्यासारख्या लहान माणसाचा नाही. माझं आणि अजित पवारांचं नातं जिव्हाळ्याचं आहे.
पण अजित पवार काय करतील हे शरद पवारांनाही कळलं नाही, ते मला कसं कळणार?
त्यामुळे अजित पवार कधी कुठला झटका देतील काही सांगता येत नाही, असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shahjibapu Patil | cm eknath shinde group mla shahajibapu patil mocks ncp leader ajit pawar
हे देखील वाचा :