नवी दिल्ली : वृत्तसंस्था- शाहजहांपूर प्रकरणात आरोपी असलेले भाजपचे नेते माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री स्वामी चिन्मयानंद यांची एसआयटीने जवळपास सात तास चौकशी केली. शाहजहांपूरच्या पोलीस लाईनीमध्ये बनलेल्या एसआयटी कार्यालयात चिन्मयानंद यांना रात्री उशीरा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांच्यावर आरोप करणाऱ्या लॉ स्टुडेंटबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले. इतकेच नाही तर विद्यार्थिनीद्वारे हॉस्टेलच्या खोलीतून पुरावे चोरण्याच्या तक्रारीवरही चिन्मयानंद यांची चौकशी करण्यात आली.
नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यात चिन्मयानंद नग्न अवस्थेत दिसत आहे. या व्हिडीओत एक 23 वर्षीय युवती नग्न अवस्थेत असणाऱ्या नागरिकाची मसाज करत अंग चोळताना दिसत आहे. संबंधित व्यक्ती चिन्मयानंद आहेत असे बोलले जात आहे. यात ती युवती आणि नागरिक यांच्यात चर्चा होतानाही दिसत आहे. छुप्या कॅमेऱ्याने हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ तपासासाठी पोलिसांकडे देण्यात आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, चिन्मयानंद यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाबाबतच्या आरोपांचा एसआयटी तपास करत आहे. यासंदर्भात एसआयटीने गुरुवारी 12 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता चिन्मयानंद यांना बोलावलं होतं. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. एसआयटीने याआधी कॉलेज हॉस्टेलचीही झडती घेतली होती. जेथून काही महत्त्वाचे पुरावे ताब्यात घेण्यात आले.
BJP leader Swami Chinmayanand was questioned by Special Investigation Team (SIT) yesterday, in connection with the alleged sexual harassment of a law student. (File pic) pic.twitter.com/T27K98Ay4Y
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 13, 2019
आरोप करणाऱ्या विद्यार्थीनीचे झाले मेडिकल
चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या लॉ विद्यार्थीनीचे बुधवारी कडक सुरक्षेत मेडिकल करण्यात आलं होतं. पीडितेला एसआयटीच्या महिला टीमसोबत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं होतं.
लॉ स्टुडेंटचे व्हिडीओ व्हायरल करत चिन्मयानंद यांच्यावर आरोप
एस एस कॉलेजच्या एलएलएमच्या विद्यार्थीनीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायासाठी मागणी करत होती. व्हिडीओमध्ये पीडितेने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक शोषणासोबतच गैरवर्तनाचेही आरोप केले होते. व्हिडीओत तिने म्हटले होते की, “संत समाजातील एक मोठ्या नेताने माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ते म्हणतात की, पोलीस आणि डीएम यांना मी खिशात घेऊन फिरतो. माझ्याकडे त्याच्याविरोधात पुरावे आहेत. त्याने अनेक मुलींचे आयुष्य उध्वस्त केले आहे.”